cgt-home-banner-img

आपल्या हृदयस्थ आत्मारामास
साष्टांग प्रणिपात !

जनी जनार्दन रामाचें चिंतन। सत्याची ही खाण रामनाम ॥१॥
गाईचें रक्षण भूतदया जाण । अतिथासी अन्न घाला तुम्ही ॥२॥
संतांचा संग विषयाचा त्याग । रामनामी दंग होऊनि राहे ॥३॥
राम कृष्ण हरि एकचि स्वरूप । अवताराची लीला वेगळाली ॥४॥
दीनदास सांगे लावूनिया ध्यान । तुम्ही आत्मज्ञान जतन करा ॥५॥

चैतन्य गोशाळा ट्रस्ट

चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही नोंदणी केलेली धर्मादाय स्वयंसेवी संस्था सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराजांच्या तत्त्वविचारानुसार गोसेवा, पीडितांची सेवा, अन्नदान आणि आत्मोन्नती अशा कार्यासाठी प्रसार, प्रचार, मदत आणि प्रत्यक्ष कार्याद्वारे जनजागृती करण्यासाठी वाहिलेली आहे. देशी गाईंचे संगोपन हा या संस्थेचा प्रमुख उद्देश असून दिडशे गाईंचा सांभाळ संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. यासह श्रीमहाराजांना अत्यंत प्रिय असणाऱ्या रामनाम व रामकथेचा सर्वदूर प्रसार करणे हाही संस्थेचा उद्देश आहे. त्या अंतर्गत देशविदेशात विविध ठिकाणी कथा महोत्सवांचे आयोजन केले जाते. समाजातील दीन-दुःखीतांना आर्थिक व मानसिक आधाराचे निमित्त होणे, या सद्हेतूने देखील संस्था कार्य करते.

ट्रस्टची उद्दिष्टे

आगामी कार्यक्रम

आळंदी

मानस अग्निपरीक्षा

दि. २९ जुलै ते दि. ६ ऑगस्ट २०२३

ओंकारेश्वर - मध्य प्रदेश

मानस नामरुप

दि. ३० सेप्टेंबर ते दि. ८ ऑक्टोबर २०२३

परळी वैजनाथ

मानस राम निवास

दि. २ डिसेंबर ते दि. १० डिसेंबर २०२३

गॅलरी

चलचित्र

छायाचित्र

cgt-home-above-footer-img